Jump to content

पायथन (आज्ञावली भाषा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पायथॉन (Python)
150px|center
रचनाकार गायडो वान रोस्सूम
विकसक पायथन सॉफ्टवेर फॉऊंडेशन
धारिका प्रकार .py, .pyc, .pyd, .pyo, .pyw
मुख्यप्रत प्रमाणपत्र पायथन सॉफ्टवेर फॉऊंडेशन प्रमाणपत्र
www.python.org


पायथन ही एक उच्चस्तरीय[] भाषा आहे. १९९१मध्ये ती प्रथम प्रकाशित झाली.

पायथनची सध्याची आवृत्ती ३.६.३ आहे. पायथॉन २.७ आणि ३ मध्ये बराच मोठा बदल झाला. सीपायथन हे C भाषेत लिहीलेले पायथन सॉफ्टवेर फाऊंडेशनचे पायथॉनसाठीचे अनुवादक आहे.

इतिहास

[संपादन]

पायथन १९८० च्या उत्तरार्धास उगमास आली आणि १९८९ दरम्यान तिचा वापर सुरू झाला. गीडो वान रॉसम हे पायथनचे जनक आहेत. अपवाद हाताळणे आणि अमीबा संगणक कार्यप्रणालीशी संलग्न असणे ही या भाषेची मुख्य वैशिष्ठ्ये आहेत.

पायथन २.० ही १६ ऑक्टोबर २०००ला प्रदर्शित झाली. चक्रीयरित्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि युनिकोड आधार ही त्यामधील मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पायथन ३.० ही ३ डिसेंबर २००८ला प्रदीर्घ चाचणीनंतर प्रदर्शित झाली. पायथन २ व पायथन ३ यांमध्ये लिहीलेल्या आज्ञावल्या एकमेकांशी विसंगत आहेत. मात्र, पायथन ३मध्ये पायथन २ च्या आज्ञावल्यांचे पायथन ३मध्ये रूपांतर करण्याची क्षमता आहे.

मांडणी व शब्दार्थशास्त्र

[संपादन]

पायथन ही वाचायला सोपी आज्ञावली भाषा आहे. इतर आज्ञावली भाषांप्रमाणे महिरपी कंसाचा वापर पायथनमध्ये होत नाही. आज्ञावलीच्याअंती अर्धविरामाचा (;) वापर हा पर्यायी असतो.

समासाचा वापर

[संपादन]

समासाचा वापर आज्ञावलीखंड दर्शवितो. समासाचा चढता वापर आज्ञावलीखंडाचा पूर्वार्ध आणि उतरता वापर उत्तरार्ध दर्शवितो.

व्याकरण

[संपादन]
  • "="(बरोबर चिन्ह):इतर आज्ञावली भाषांच्या तुलनेत "="चा वापर हा वेगळे अर्थ दर्शवितो. उ.दा: C भाषेमध्ये, " x = 2 " या आज्ञावलीचा अर्थ असा होतो कि उजव्या बाजूला असलेली किंमत डाव्याबाजूच्या अनित्य संख्येमध्ये नक्कल करा. पण C मध्ये अनित्य संख्या व किंमत ही एका जातीचे असणे आवश्यक आहे.षहा नियम पायथॉन मध्ये पाळणे आवश्यक नसते.

वैशिष्ट्ये

[संपादन]
  • पायथन ही एक बहुभिमुख आज्ञावली भाषा आहे. म्हणजे ती वस्तुभिमुख[], कार्यनिष्ठ, रचनात्मक अशा कोणत्याही प्रकारे वापरता येते.
  • या भाषेचा विकास करताना ती अधिकाधिक नैसर्गिक वाटेल यादृष्टीने व्याकरण बनवले आहे.
  • तसेच, आज्ञावली अधिकाधिक वाचनीय होईल यादृष्टीने भाषेचे व्याकरण बनवले आहे. उदा. यात आज्ञावलीखंड गुंफताना कंस वापरण्याऐवजी समास सोडला जातो.
  • ही एक विवृत भाषा आहे.[]
  • डायनॅमिक चलप्रकार व्यवस्था वापरली जाते.[]
  • स्मृती स्वव्यवस्थापन असते.
  • यात युनिकोड चलनामे वापरता येतात.[] (खालील उदाहरण पहावे.)
  • पायथन मुक्त स्रोत आहे.[]

उदाहरण

[संपादन]
उत्तर = input("पायथन सोपी आहे का? ")
if उत्तर == "हो":
	print("छान")
a=b=c=1
a,b,c = 1,2,"john"

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. पायथनचे अधिकृत संकेतस्थळ
  2. पायथनचे अधिकृत दस्तावेजीकरण

Follow Lee on X/Twitter - Father, Husband, Serial builder creating AI, crypto, games & web tools. We are friends :) AI Will Come To Life!

Check out: eBank.nz (Art Generator) | Netwrck.com (AI Tools) | Text-Generator.io (AI API) | BitBank.nz (Crypto AI) | ReadingTime (Kids Reading) | RewordGame | BigMultiplayerChess | WebFiddle | How.nz | Helix AI Assistant